ADSptp

Friday, 17 February 2017

प्रिंटर

प्रिंटर


मोँनिटरच्या स्क्रीन वर जी माहिती मिळते त्यास आउटपुट असे म्हणतात .हा आउटपुट संगणक बंद केला की दिसेनासा होतो . स्क्रीन वर , हार्ड डिस्क , फ्लोपी डिस्क वर मिळणाऱ्या माहिती मध्ये पाहिजे तेव्हा बदल करता येतो म्हणुन अशा माहितीला सॉफ्ट कॉपी असे म्हणतात . संगणका मधून अशी माहिती प्रिंटर या प्रदान म्हणजेच आउटपुट डिवाइस मधून कागदावर छापता येते . प्रिंटर ने छापलेली माहिती तशीच राहते म्हणुन त्या माहितीला हार्ड कॉपी असे म्हणतात. प्रिंटर हे परेलाल किवा यूएसबी केबल द्वारे CPU मध्ये मदर बोर्ड ला जोडले जाते .


प्रिंटर चे सध्या ३ भाग प्रचलित आहेत .

1) डॉट मेट्रिक्स प्रिंटर :-
ह्या प्रिंटर मधील अक्षरे अनेक टिम्बाच्या स्वरूपात छापली जातात. गोल बारीक़ पिन्सची एक किवा दोन लाइनची मालीका असते . प्रतेक पिन स्वतन्त्र पणे शाईच्या रिबिन्वर आघात करते . त्या मुळे रिबिन्वारिल शाईचा ठपका कागदावर उमटतो . संगणकाच्या संदेशा प्रमाने पिन्स रिबिन वर जलद गतीने आघात करतात त्या मुळे कागदावर टीबाच्या स्वरूपात अक्षरे उमटतात .
डॉट मेट्रिक्स प्रिंटर हे कमी खर्चाचे असतात . पण प्रिंटिंगच्या वेळी खुप मोठा आवाज करत प्रिंटिंग करतात . बँकेच्या ठिकाणी अशाच प्रकारचे प्रिंटर वापरले जातात

२) इंक जेट प्रिंटर :-
हे प्रिंटर शाईच्या तुषार जल्द गतीने फवार्य सारखे उडतात .इंकच्या तुषार सूक्ष्म छिद्रांच्या नॉझल्सने कागदावर उडवले जातात .यात नोझल्सच्या मदतीने योग्य प्रमाणात चार प्राथमिक रंग मिसळुन रंगित प्रिंट करता येते .

३) लेझर प्रिंटर :-
हे प्रिंटर छापाईसाठी लेझर किरणांचा वापर करतात. संगणका कडून येणार्या माहिती नुसार हे लेझर किरण सतत गोल फिरणारया ड्रमवर पडली जाते . या लेझर किरण मुळे ड्रमवर स्थिर विद्युत प्रभाराचे ठिपके तयार होतात . ड्रमच्या लगत असलेली कोरडी शाईची भुकटी (टोनर) ड्रम वरील विद्युत् प्रभारित कागदावर मचकुराच्या ओळी किवा चित्राचे भाग तयार होतात .
सध्या ओल इन वन (All In One ) प्रिंटरला जास्त मागणी आहे कारण हयात सर्व प्रकारचे Function आहेत . झेरोक्स , स्कैनर , प्रिंटर , फैक्स अशा सर्व गोष्टी एकात मिळतात ह्या मुळे अशा प्रिंटरला जास्त डिमांड आहे .

स्कैनर


स्कैनर


स्कैनर :- स्कैन केलेली माहिती आणि तीची प्रतिमा सिस्टिम युनिट मध्ये प्रक्रिया करू शकेल अशा भाषेत रूपांतरित करण्याच काम स्कैनर करते . स्कैनिंग उपकरणे ३ प्रकारची आहते ओप्टिकल स्कैनर , बार कोड स्कैनर आणि अक्षरे व चिन्हे ओळखणारी उपकरणे .


ओप्टिकल स्कैनर :- याना नुसते स्कैनर असे म्हणतात .माहिती आणि इमेज म्हणजेच प्रतिमा सिस्टिमला वाचता येइल अशा स्वरूपात स्कैन म्हणजे प्रक्रिया करून देतात . ओप्टिकल स्कैनर ला अक्षरे किवा प्रतिमा समजत नाहीत तर अक्षरे आणि प्रतिमा तयार करण्यासाठी प्रकाश , अंधार आणि रग बेरंगी आकर मात्र स्कैनर ला समजतात . स्कैन केलेली माहिती फाइल रुपात संगणका मध्ये साठवली जाते . ती वाचता अथवा प्रिंट ही करता येते .ओप्टिकल स्कैनर चे ही २ प्रकार आहेत

१) फ्लैटबेड स्कैनर :- हयात एखाद्या पेज च्या प्रति बनवण्या साठी स्कैनर च्या काचेवर ते पेज ठेवले जाते तो ते स्कैन करतो.

२) पोर्टेबल स्कैनर :- हे हातात धरून स्कैन करण्याचे उपकरण आहे ,
बार कोड स्कैनर रीडर :- आपण मोठ्या दुकानात किवा शोपिंग मोंल मध्ये अशा प्रकारचे स्कैनर पाहिले असेल अशा प्रकारचे स्कैनर हातात धरून स्कैन केले जाते. काही रीडर विशिष्ट जागी बसवले जाते
त्यानां फ्लैट फॉर्म रीडर असे म्हणतात . त्यात स्कैन केलेले कोड संगणका मध्ये पाठवले जाते त्यात वजन, कीमत आणि वस्तूची उपलब्धी ह्या सर्व माहिती साठवल्या जातात. स्कैनर माहितीची पड़ताळणी करून वस्तूची ताजी माहिती इलेक्टिकल कैश रजिस्टर्ला देतो . हयात वास्तुच्या किमतीचा तपशील ही असतो .

अक्षरे आणि चिन्हे ओळखणारी स्कैनर :- अशा स्वरुपाची स्कैनर अक्षरे आणि चिन्हे ओळखण्यासाठी येतात . विशिष्ट उद्देश साठी अशी स्कैनर वापरली जातात . बैंक मध्ये चेक वर ची अक्षरे ओळखण्यासाठी तसेच पेन्सिल ने केलेली खून ही अनेक पर्याय मधून निवडली आहे का नाही त्या नुसार गुण मोजणी साठी हे उपयोगी पडतात ह्या मध्ये ३ प्रकार आहेत . MICR , OCR, OMR. 

पेन ड्राइव


पेन ड्राइव


CD मध्ये डाटा स्टोर करायला CD राईटर लागतो. ज्या ठिकाणी CD राईटर नाही त्या ठिकाणी डाटा कॉपी करण कठिण जात . फ्लोप्पी मध्ये खुप कमी डाटा स्टोर करता येतो म्हणुन फ्लोप्पी चा उपयोग जास्त मोठा डाटा कॉपी करण्यासाठी येत नाही . अशा वेळेस पेन ड्राइव हे अतिशय उपयुक्त साधन आहे .पेन ड्राइव मधे 256MB पासून ते सध्या 8GB पर्यंत साइज़ असणारे पेन ड्राइव उपलब्ध झाले आहेत . या मध्ये डाटा कॉपी करण ही अतिशय सोप आहे . ज्याप्रमाने आपण एखादी फाइल पीसी मध्ये कॉपी करून दुसरीकडे पेस्ट करतो त्याच प्रमाने पेन ड्राइव मध्ये आपण डाटा पेस्ट अथवा कॉपी करू शकतो .पेन ड्राइव USB पोर्ट ला जोडला जातो . पीसी ला जोडून आपणास पेन ड्राइव एक्सेस करायचा असल्यास माय कॉम्प्युटर आपण ओपन करून त्यात C: ड्राइव सारखा दुसर्या नावाचा पेन ड्राइवचा ड्राइव ओपन होतो . पेन ड्राइव मध्ये आता MP3 प्लेयर देखिल आले आहते ज्यामुळे आपण त्याचा २ प्रकारासाठी वापर करू शकतो . गाणी श्रवण करण्यासाठी आणि डाटा कॉपी करण्यासाठी .